माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: जिल्हा प्रशासनाने शहरातील मुकुंदनगर हा भाग सील केलेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत ही बाब लक्षात घेऊन मुकुंदनगर मध्ये राहत असलेल्या अडीच हजार घरांना घरपोहोच स्वस्त धान्य वितरण व्हावे या स्वस्त धान्याचा खर्च मी देईल असे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.
शहरातील कोरोना विषाणू फैलाव होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठकीचे आज दुपारी आयोजन केले होते या बैठकीला महापौर बाबासाहेब वाकळे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे आदींसह महापालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते
या बैठकीत खासदार विखे पाटील यांनी करुणा बाधित त्यांची शहरातील संख्या करून टाईम केलेल्या नागरिकांची संख्या त्यांच्यासाठी केलेल्या उपाययोजना राहण्याची व्यवस्था मुकुंदनगर परिसराची सद्यस्थिती याचा आढावा घेतला खासदार विखे म्हणाले मुकुंदनगर मध्ये नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे भाजीपाला किराणा यासंदर्भातील अनेक अडचणी त्यांना येत आहेत त्या दूर होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे मुकुंद नगर मध्ये नागरिकांना घरपोच स्वस्त धान्य सेवा कशी उपलब्ध होईल याबाबतही त्यांनी चर्चा केली.
कर्मचाऱ्यांना सेनेटायझर
महापालिकेतील दोन हजार सोळा कर्मचाऱ्यांना सोळाशे टायझरच्या बाटल्या खासदार सुजय विखे यांच्याकडून महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या
Post a Comment