मलेशियावरुन केरळला आलेल्या कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू



माय अहमदनगर वेब टीम
बीजिंग/नवी दिल्ली- केरळमध्ये आज(रविवार) कोरोना व्हायरस संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तो काही दिवसांपूर्वी मलेशियावरुन परत आला होता आणि एर्नाकुलममध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल होता.

दुसरीकडे, चीनच्या हुबेई प्रांतात कोरोनाने अजून 35 जणांचा बळी घेतला आहे, चीनमध्ये आता मृतांचा आकडा 2,870 वर पोहचला आहे.
 नॅशनल हेल्थ कमीशनने सांगितल्यानुसार, कोरोना संक्रमणाचे 573 केसेस समोर आल्या आहेत. आता एकूण 79,824 कोरोना ग्रस्तांची संख्या झाली आहे. चीननंतर सर्वात जास्त संकर्म दक्षिण कोरियामध्ये झाले आहे, तेथील 3,526 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
परंतू, जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत संक्रमण होण्याची संख्या कमी झाली आहे. कोरियाच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेन्शनकडून जारी केलेल्या माहितीनुसार, संक्रमणाचे अंदाजे 90% केसेस नॉर्थ ग्यॉन्गसेंग प्रांतातील डायगुमध्ये होते.

मागील काही दिवसात मलेशियामध्ये कोरोना व्हायरसची 25 प्रकरणे समोर आली आहेत. मलेशियातून काही दिवसांपूर्वी आलेल्या केरळच्या एका व्यक्तीचा आज मृत्यू झालाय. त्याला एर्नाकुलमच्या हॉस्पीटलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. यापूर्वीच त्याची तपासणी करण्यात आली होती, त्याची रिपोर्ट निगेटीव्ह निघाली होती. तरीदेखील त्याचा मृत्यू झाला, पण डॉक्टरांचे म्हणने आहे की, जेव्हा तो कोच्चीला पोहचला होता, तेव्हाच खूप आजारी होता. सध्या त्याचे सँपल्स तपासणी साठी पाठवले आहेत, पण तो रुग्ण डायबेटीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post