टिकटॉक डाऊनलोड करू नका, ते स्पायवेयर; रेडिटच्या सीईओंचा इशारा


माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - शॉर्ट व्हीडिओ मेकिंग अॅप टिकटॉकचे जगभरात ५० कोटी सक्रीय यूजर्स आहेत. अॅप गेल्या वर्षीच झपाट्याने वाढले आहे. टिकटॉकवर आतापर्यंत अनेकांनी प्रश्नचिन्ह लावले आहे. अमेरिकी सोशल डिस्कशन वेबसाइट रेडिटचे सहसंस्थापक व सीईओ स्टीव्ह हफमॅन यांनी टिकटॉक डाऊनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, मला हे अॅप पॅरासाइटसारखे वाटते. ते नेहमी तुमचे एेकते. त्याचबरोबर फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञानाचाही वापर करते. हे खूप धोकादायक आहे. मी माझ्या मोबाइलमध्ये अशा प्रकारचे अॅप डाऊनलोड करत नाही. एका वेबसाइटने हे अॅप स्पायवेयर असल्याचे सांगितले आहे. हफमॅनच्या वक्तव्यानंतर टिकटॉकच्या प्रवक्त्यांनी आरोप फेटाळले आहेत. टिकटॉक सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
टिकटॉकवर दृष्टिक्षेप
> भारतात टिकटॉकचे युजर्स २० काेटींपेक्षा जास्त
> १५५ देशांत १५ भाषांत उपलब्ध
> ४१ % युजर्स १६ ते २४ वर्षांचे
> ५२ मिनिटे सरासरी टिकटॉकवर
> १० पैकी ९ युजर्स दररोज याचा वापर करतात
> १०० कोटी व्हिडिओ टिकटॉकवर दररोज पाहिले जातात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post