कोरोनाच्या भीतीने तुळजाभवानी, रेणुकादेवी, वैद्यनाथाची दारे बंद
माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - कोरोना व्हायरसच्या धास्तीने मराठवाड्यातील बहुतेक सर्वच मोठे यात्रोत्सव रद्द करण्यात आले आहेत. माहूर येथील रेणुकादेवी मंदिर आणि तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर अनिश्चित कालावधीसाठी भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. परळी वैद्यनाथ येथील या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिरही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंदिरांमध्ये पुजाऱ्यांकडून नित्य धार्मिक विधी केले जाणार आहेत. नांदेड येथील गुरुद्वारातील गर्दीही नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आले आहे. परभणीचे जिल्हाधिकाऱ्यांनी तर कर्मचाऱ्यांसाठी आणीबाणी जाहीर करीत सर्वांच्या सुट्या रद्द केल्याा आहेत.

त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही सुटी घेता येणार नाही. कोरोनाच्या सावटामुळे रेल्वे तसेच बस प्रवाशांची संख्या लक्षणीय घटली आहे. नोकरी, िशक्षणानिमित्त मोठ्या शहरांत गेलेल्या अनेकांनी काढता पाय घेत आपले गाव गाठणे सुरू केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post