पुण्यातून मुंबईला आलेल्या वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू, पत्नी क्वारंटाइनमध्ये



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- येथील कस्तूरबा हॉस्पीटलमध्ये आज(दि.17) 64 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. व्हायरसमुळे मृत्यू झालेला देशातील तिसरा रुग्ण आहे. याआधी कलबुर्गीमध्ये 63 वर्षीय एका व्यक्तीचा आणि दिल्लीमध्ये 69 मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या बुलडाण्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला, पण त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. देशात कोरोना संक्रमितांची संख्या 127 झाली आहे. 17 मार्चला 8 नवीन रुग्ण आढळले आहेत.
पुण्यातील ज्या कुटुंबाला गेल्या आठवड्यात टॅक्सी चालकामुळे कोरोनाची लागाण झाली होती, तोच ड्रायव्हर या कपलच्याही संपर्कात आला होता. त्यानेच पुण्यातून या कपलला मुंबईपर्यंत सोडले होते. त्यानंतर वृद्ध दांपत्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. टेस्ट घेतले असता, त्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकीच वृद्ध व्यक्तीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post