पंकजा मुंडेंचे मुंबई बंदवर भाष्य




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- भाजप नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई बंद करण्याच्या पर्यायावर मत व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन म्हटले की, नियोजनबद्ध पद्धतीने मुंबई बंद ठेवल्यास, लाखो लोकांना उपयोग होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ''मुंबई बंद करुन मदत मिळेल का? जर हे नियोजनबद्ध पद्धतीने मुंबई बंद केली, तर लोक यासाठी तयारी म्हणून जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. 7 दिवसांसाठी लोकल ट्रेन्स बंद ठेवल्यास लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल. आवश्यक दुकाने उघडी ठेवता येतील, मात्र शॉपिंग बंद ठेवावी. अशा प्रयत्नांचा नक्कीच उपयोग होईल,'' असे मत त्यांनी व्यक्त केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post