कोरोनापासून बचावासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सुचवली भन्नाट आयडिया



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 42 वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी 'कोरोना'पासून बचावासाठी एक भन्नाट आयडिया सुचवली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे
> “हात धुवा, हात धुवा, हात धुवा, असे धुवा, तसे धुवा, ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना? ऐकण्याचा कंटाळा येऊ द्या, पण हात धुण्याचा मात्र कंटाळा करु नका, असे अमोल कोल्हेंनी या व्हिडीओत म्हटले आहे.

> या व्हिडिओत अमोल कोल्हेंनी एक भन्नाट आयडियाही सुचवली आहे. “अत्यंत सोपी आणि साधी हात धुण्याची पद्धत आहे. त्यासाठी SUMAN M’ हे नाव लक्षात ठेवा. साबण लावून कमीत कमी 20 सेकंद हे चालले पाहिजे. S – सरळ, U- उलट, M – मूठ, A- अंगठा, N – नखं आणि M म्हणजे मनगट,” असे अमोल कोल्हे म्हणाले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post