कोरोनामुळे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर व शनी मारुती मंदिर बंद


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सध्या सर्व जगभरात कोरोना विषाणूने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोना वायरस हा संसर्गजन्य असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे मंदिरात अनेक भाविक दैनदिन दर्शनास येत असतात. त्यामुळे सहाजिकच भाविकांची गर्दी मोट्या प्रमाणवर होत असते. तसेच श्री च्या आरतीच्या वेळी असंख्य भाविक उपस्थित असतात .खबरदारीचा उपाय म्हणून हे करणे विश्वस्त मंडळाला आवश्यक वाटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे .त्यामुळे भाविकांची गैरसोय मोठ्या प्रमाणवर होणार आहे त्याबाद्दल देवस्थान ने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर व शनी मारुती मंदिर दि ३१-०३-२०२० बंद ठेवण्याचा निर्णय अध्यक्ष ऍड अभय आगरकर यांनी सांगितले आहे. यावेळी उपाध्यक्ष पंडित खरपुडे , सचीव अशोक कानडे ,रंगनाथ फूलसुदंर, पांडुरंग नन्नवरे , चंद्रकांत फुलारी , हरिचंद्र गिरमे , गजानन ससाणे, विजय कोथीबीरे, रामकृष्ण राऊत, बाबासाहेब सुडके आदी उपस्थतीत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post