'या'गैरव्यवहारप्रकरणी मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्रात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ऊर्जा मंत्री, डॉ.नितीन राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आज विधानपरिषदेत आमदार संजय दौंड यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर दिले.

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी व मे. रिशू किचू प्रा.लिमिटेड कंपनीयांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार, फसवणूक व गैरव्यवहाराचे प्रकरण उघड झाले आहे. थर्मल पॉवर असोसिएशनने याबाबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे 22 जानेवारी 2020 रोजी तक्रार दिली आहे. तसेच संबंधित मे. रिशू किचू प्रा.लिमिटेड कंपनीने, मे. साई कंस्ट्रक्शन प्रोप्रायटरी फर्मने मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील दोंगलिया येथील सिगाजी थर्मल पॉवर प्रोजेक्ट या कंपनीच्या नावे बोगस बनावट कागदपत्रे सादर करून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 15 जुलै2017 आणि 27 मार्च 2017 रोजीच्या निविदा मिळवल्याचे देखील माहिती अधिकारात उघड झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post