गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोलिसांना आदेश



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, अन्न व औषध प्रशासनाकडून आलेल्या सूचनांनुसार गृहविभागातील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. कोरोना व्हायरसनंतर मास्कचा काळाबाजार व डूप्लीकेट सॅनिटायझर बनवण्याचं कोण काम करत असेल तर अशांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

यामध्ये मास्कचा काळाबाजार असेल किंवा सॅनिटायझर डूप्लीकेट प्रकार असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेच शिवाय ज्या फेक न्यूज आहेत. मोबाईलच्या व्हॉटसअप मेसेजवरून गैरसमज पसरवत आहेत त्यांच्यावर सायबर गुन्ह्याखाली कारवाई करण्यात येणार आहे असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

दरम्यान तुरुंगातील कैद्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर संशयित कुणी सापडलं तर त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग स्थापन करून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना गृहविभागाच्यावतीने पोलिसांना देण्यात आल्या आहेत अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post