सरकारने कोरोनाला राष्ट्रीय संकट घोषित केले
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- देशात 91 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारने शनिवारी राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. गृह मंत्रालयने देशात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्यास, कुटुंबाला 4 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत दिली जाईल. कोरोना संबंधी मदत कार्याल सहभागी लोकांनाही भरपाईमध्ये सामील करण्यात आले आहे. आतापर्यंत देशातील 13 राज्यांमध्ये संक्रमण पसरले आहे. राज्य सरकारकडून जारी केलेल्या आकड्यानुसार, देशात आतापर्यंत 91 जणांना कोरोनाची लागण
झाल्याचे समोर आले आहे.
यातच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यात एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये वडील आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याची पुष्टी गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने शनिवारी केली. तेलंगाणामध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. शनिवारी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही रुग्णांना गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याशिवाय दोन संशयित रुग्णांनाही निगरानीत ठेवले आहे, त्यांची रिपोर्ट येणे बाकी आहे.
Post a Comment