मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, ट्विटरवरुन दिली माहिती




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - देशात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या भीतीने राज्य सरकारने अनेक सरकारी कार्यक्रम रद्द केले. तसेच, काही काळासाठी मुंबई आणि पुण्यातील अनेक सार्वजनिक ठिकाणे बंद करण्याचे आदेश दिले. यातय आचा खबरदारी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली.

मनसेने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून गुढीपाडवा मेळावा रद्द करत असल्याचे सांगितले. त्यांनी लिहीले, ‘कोरोना’चं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत. तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post