एमआयडीसीतील उद्योगांच्या प्रश्‍नांबाबत शरद पवार लक्ष घालणार


‘आमी’ च्या शिष्टमंडळाने मुंबईत भेट घेवून केली चर्चा

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अहमदनगर एमआयडीसीतील उद्योगांना अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एमआयडीसीचा विस्तार होत नसल्याची बाब आमी संघटनेने राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर एमआयडीसीतील उद्योगांचे प्रश्‍न सोडविण्याबरोबरच विस्ताराबाबत स्वत: लक्ष घालणार असल्याचे आश्‍वासन खा. शरद पवार यांनी संघटनेला दिले.

मुंबई येथे आमी संघटनेच्यावतीने आ. संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने 13 मार्च रोजी शरद पवार यांच्याबरोबर एमआयडीसीतील विविध प्रश्‍न व विस्तार वाढीसाठी विस्तृत चर्चा केली. शरद पवार यांनी अत्यंत आस्थेने व आपुलकीने उद्योजकांचे प्रश्‍न समजावून घेतले व ते प्रश्‍न सोडवण्यासाठी तसेच जलद प्रयत्न करता येतील याबाबत चर्चा केली. आ. संग्राम जगताप यांनी एमआयडीसीतील सद्य परिस्थिती व विस्तार वाढीसाठी ते स्वत: करीत असलेले प्रयत्न याविषयी पवारांना माहिती दिली. एमआयडीसीमध्ये नवीन मोठा उद्योग देण्यासाठी त्यांनी पवार यांना विनंती केली.




खा. पवार यांना निवेदन देताना आ. संग्राम जगताप यांच्या समवेत आमी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे तसेच सुनील कानवडे, सागर निंबाळकर, सचिन काकड, मिलिंद कुलकर्णी इ. उद्योजक उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post