नागरिकांसाठी करोना आजारा संदर्भात मनपाकडून कठोर निर्णय घेण्‍याचे आदेश – महापौर बाबासाहेब वाकळे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - करोना आजार हा संसर्ग जन्‍य आजार आहे. त्‍यामुळे मोठया प्रमाणात नागरिकांनमध्‍ये संसर्ग होवू शकतो; यासाठी प्रत्‍येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. मनपा प्रशासनाने येत्‍या 15 दिवस कठोर निर्णय घ्‍यावेत. समाजामध्‍ये जनजागृतीसाठी विविध उपाय योजना कराव्‍यात शहरातील उदयाने, हॉटेल ,धार्मिक स्‍थळे, व शहरातील विविध ठिकाणी असणा-या चौपाटया ,जॉगिंग ट्रॅक, मंगल कार्यालय, शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍स, या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक एकत्र येत असतात त्‍यामुळे बंद करण्‍याचे आदेश मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दिले.

अ.नगर मनपा हद्दीत व उपनगरामध्‍ये करोना विषाणू बाबत उपाय योजनांची तात्‍काळ अंमलबजावणी करणेकरिता मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी बैठक घेतली यावेळी नुतन आयुक्‍त श्री.श्रीकांत मायकलवार ,उपमहापौर मा.सौ;मालनताई ढोणे, महिला व बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती मा.सौ.लताताई शेळके, उपसभापती मा.सौ.सुवर्णाताई गेणप्‍पा, उपायुक्‍त श्री.सुनिल पवार, डॉ.प्रदिप पठारे नगरसेवक मा.श्री.भैय्या गंधे, मा.श्री.मनोज कोतकर, मा.श्री.राहुल कांबळे, मा.श्री.संजय ढोणे, मा.श्री.अजय चितळे, मा.श्री.अजिंक्‍य बोरकर, आरोग्‍याधिकारी डॉ.अनिल बोरगे, वैद्यकिय उपआरोग्‍याधिकारी डॉ.राजूरकर, डॉ.शंकर शेडाळे, डॉ.कविता माने, डॉ.आरती डापसे, डॉ.अश्विनी मरकड, डॉ.आएशा शेख, मुख्‍य स्‍वच्‍छता निरिक्षक राजकुमार सारसर, एस.टी.महामंडळ तारकपूर आगाराचे श्री.अविनाश कल्‍हापुरे, शहर बस सेवा व्‍यवस्‍थापक श्री.रावसाहेब काकडे आदी उपस्थित होते.

यावेळी मा.महापौर श्री;बाबासाहेब वाकळे यांनी आरोग्‍याधिकारी डॉ.बोरगे यांचेकडून करोना बाबत माहिती घेतली असता शिंकणे, खोकणे, यावाटे हवेमार्फत या विषाणूचा प्रसार होतो. करोना विषाणू हा प्राणिजन्‍य आजार आहे. नगर शहर व उपनगरातील नागरिकांनी स्‍वत: सुरक्षित राहण्‍यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्‍यासाठी उपाय योजना करणे आवश्‍यक आहे. नागरिकांनी वारंवार हात धुवावेत. जरी तुमचे हात खराब झाले नसतील तरी हॅण्‍ड वॉश किंवा साबण लावून हात धुवावेत. शिंकणे व कोरडा खोकला आपले तोंड व नाक टिशू पेपर किंवा रूमालाने पुसावेत. कच्‍चे मास खाऊ नये, फळे व भाज्‍या न धुता खाऊ नयेत.

नागरिकांना ताप खोकला आणि श्‍वास घेण्‍यास त्रास होत असेल तर स्‍वत:हून कोणताही उपचार करू नये; डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याने उपचार घ्‍यावेत व मनपा आरोग्‍या केंद्राशी संपर्क करावा. जास्‍त गर्दीच्‍या ठिकाणी जाणे टाळावे,

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post