‘मेरे डॅड की दुल्हन’ च्या सेटवर लागली आग, श्वेता तिवारीचा भाजला हात




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘मेरे डॅड की दुल्हन‘ मध्ये दिसतेय. या मालिकेच्या सेटवर अाग लागली होती. त्यामध्ये श्वेताचा हात भाजला. या अपघातानंतर प्राॅडक्शन टीममध्ये खूप गोंधळ निर्माण झाला. परंतु, आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आल्यामुळे मोठी हानी टळली. वास्तविक, अभिनेता फहमान खान आणि श्वेता हे दोघे करीना कपूर-शाहिद कपूरचा ‘जब वी मेट’ या चित्रपटातील एक दृश्य रीक्रिएट करत होते. यात श्वेताला तिचा स्कार्फ आिण साडी जाळायची होती आणि याचदरम्यान पडद्याला अचानक आग लागली. आग लागल्याचे दिसताच श्वेताने ती विझवण्याचा प्रयत्न केला यादरम्यान तिचा हातभाजला.

फहमाने या अपघाताबाबत सांगितले ...

चित्रीकरणादरम्यान त्याने 'गुनीत' म्हणजे श्वेताला डेटचा सर्व राग काढण्यासाठी तिची साडी आणि स्कार्फ जाळण्याचा सल्ला दिला. या चित्रीकरणादरम्यान ती 'जब वी मेट'चे दृश्य रीक्रिएट करत होती आणि सेटवर खूप मस्तीही सुरू होती, परंतु अचानक पडद्याला आग लागली आिण अाग विझवण्याच्या नादात श्वेता तिवारीचा हात भाजला. श्वेता आग विझवत होती तर सर्वांना वाटले की ती तिचे दृश्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत अाहे, परंतु तिचा हात भाजल्याचे समजले तर संपूर्ण टीम मदतीला आली आिण आगीवर नियंत्रणही मिळवले. श्वेताचा हात भाजला होता तरी तिने चित्रीकरण पूर्ण केले. मात्र, श्वेता तिवारी याबाबत अद्यापही काहीही बोलली नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post