'या' कारणामुळे लसीचा प्रभाव वाढणार ?
माय अहमदनगर वेब टीम
लसीकरण अनेक आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्य होते. मात्र, यासंदर्भात नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातील निष्कर्षानुसार लसीकरणाची पद्धत बदलून लसीचा प्रभाव अनेक पटीने वाढविला जाऊ शकतो. शास्त्रज्ञांनी सांगितले की, लसीकरणानंतरही जगात सध्या टीबी आणि क्षयरोग हे सर्वाधिक मृत्यूचे कारण बनू लागले आहेत. मात्र, लस देण्याची पद्धत बदलल्यास त्याचा लाभ जास्त होईल, असे संशोधकांचे मत आहे.
संशोधनादरम्यान असे आढळून आले की, पारंपारिकरित्या सध्या त्वचेत इंजेक्शन दिले जाते. मात्र, या तुलनेत इंजेक्शन जर थेट रक्तवाहीनीत दिले तर ते जास्त प्रभावी ठरू शकते. संशोधक जोएन फ्लिन यांनी सांगितले की, यासंबंधीची चाचणी जनावरांवर घेण्यात आली. यावेळी असे आढळून आले की, जर रक्तवाहिन्यांमध्ये थेट इंजेक्शन दिले तर त्याचा परिणाम एक लाख पटीने वाढू शकतो. असे केल्यास इंजेक्शनमधील औषध थेट रक्तातून फुफ्फुस आणि इतर अवयवांपर्यंत लवकर पोहोचते. यामुळे लस निष्प्रभावी होण्यापूर्वीच औषध कोशिकांना ताकदवान बनवते. आजारी असताना औषधामुळे कोशिकांना वेळेत ताकद मिळाल्यास रूग्णाची प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे आजार लवकर बरा होण्याची शक्यता बळावते. यामुळेच लस देण्याची पारंपारिक पद्धत बदलण्याची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
Post a Comment