145 देशांत पसरला कोरोना : जगात 5436 जणांचा मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांनंतर अमेरिकेत राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीची घोषित केली. तसेच सर्व राज्यांना त्वरित कठोर खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले गेले आहे. ट्रम्प म्हणाले की, "मी अधिकृतपणे देशात आपत्कालीन स्थिती जाहीर करतो. यूएस राज्यांमधील कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला ट्रम्प प्रशासनाकडून 50 अब्ज डॉलर्स देण्यात येतील." दुसरीकडे जगभरात कोरोना व्हायरसचे एकूण 1 लाख 45 हजार 634 प्रकरणे समोर आली आहेत. आज (शनिवार) सकाळपर्यंत एकूण 5436 लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपतींनी राज्यांना आवाहन केले की, "सर्व राज्यांनी या संकटाच्या वेळी कोरोनाव्हायरसशी सामना करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्ही राज्यांना 50 अब्ज डॉलर्सचा निधी जारी करीत आहोत. एक राष्ट्रीय डेटा सेंटर आणि स्पेशल युनिट तयार केले गेले आहे. यातून संपूर्ण देशाचे निरीक्षण केले जाईल. या महामारीपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकन सरकार प्रत्येक पावले उचलणार आहे."
Post a Comment