शिवसेना उपतालुकाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या
माय अहमदनगर वेब टीम
कोपरगाव - तालुक्यातील भोजडे गावात शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुख सुरेश शामराव गिरे (वय ४४ वर्ष ) यांच्यावर चारचाकी वाहनातून येऊन हल्लेखोरांनी गोळ््या झाडून हत्या केली.
रविवारी (दि. १५) गिरे यांच्या राहत्या घरात हल्लेखोर घुसले. गिरे यांच्या डोक्यात पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडल्या. चॉपर, तलवारीने वार केले. या हल्ल्यात गिरे हे जागीच ठार झाले. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर तत्काळ त्याच गाडीतून पसार झाले. या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले आहे. या घटनेतील हल्लेखोरांची संख्या दोन ते तीन असल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. कोपरगाव मध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
Post a Comment