‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाचे अधिवेशन पुढे ढकलले - बापूसाहेब तांबे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जगभरात वेगाने पसरत असलेल्या ’कोरोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे नागोठणे, ता.रोहा, जि.रायगड येथे 13 मार्च रोजी होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा शिक्षकनेते संभाजीराव थोरात यांनी केली असल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी दिली.

प्राथमिक शिक्षक महासंघाने नागोठणे ता.रोहा जि.रायगड येथे 13 मार्च रोजी अधिवेशन आयोजित केले होते. त्यासाठी राज्य शासनाने दि. 9 मार्च ते 14 मार्च पर्यंत विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली होती. प्राथमिक शिक्षक महासंघ अधिवेशनासाठी संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी प्रसार व प्रचार करुन मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी केली होती.

मात्र सध्या देशात कोरोनाची साथ असल्याने त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन जमावबंदी लागु केली आहे. तसेच खा.शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे कार्यक्रम पुढे ढकलावेत असे सुचित केल्याने नागोठणे येथे 13 मार्च रोजी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात येत आहे. कोरोनाची तिव्रता कमी झाल्यानंतर शासनाकडुन विशेष नैमित्तिक रजा मंजूरीचे पत्र घेऊनच अधिवेशनाची तारीख नंतर कळवण्यात येईल, असे संभाजीराव थोरात यांनी जाहीर केलेलं आहे.

पुढील अधिवेशनासाठी आता फाडलेल्या पावत्या चालतील, नविन पावती घेण्याची आवश्यकता राहणार नाही असे आवाहन संघाचे पदाधिकारी आबासाहेब जगताप, बापुसाहेब तांबे, अरुण आवारी, संतोष दुसुंगे, मोहनराव पागिरे, किसनराव वराट, संदिप मोटे, रामेश्वर चोपडे, बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे, बाळासाहेब तापकीर, श्रीमती विद्युलत्ता आढाव, राजकुमार साळवे, आर. के. ढेपले, निळकंठ घायतडक, दत्ता कुलट, सत्यवान मेहेरे, मच्छिंद्र लोखंडे यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post