श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलचे एनएमएमएस परिक्षेत यश


यशाची परंपरा कायम राखत शाळेचे नाव उंचावले-शांतीलाल गुंदेचा
माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - शिशु संगोपन संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच त्यांना विविध स्पर्धां परिक्षांमध्ये सहभागी करुन त्यांच्याकडून तयारी करुन घेतली जाते आणि हे विद्यार्थीही चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उंचावत आहेत. आज यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक करतांना आनंद होत आहे, असे प्रतिपादन शिशु संगोपन संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा यांनी केले.

माहे नोव्हेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इ.8 वी मधील एकूण 41 विद्यार्थींनी राष्ट्रीय आर्थिक व दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परिक्षेत सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, रोहित कांबळे, सुजय कुटे, कृष्णा हजारे, जय ओहोळ, पियुष शेरकर हे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. या विद्यार्थ्यांना इ.12 वी पर्यंत प्रत्येकास दरवर्षी रु.12 हजारांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. अशी एकूण चार वर्षे प्रत्येकास रु. 48 हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्यावतीने अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ.कांचन गावडे, शिक्षिका सौ.जयश्री उंडे, विजय सावळे, पांडूरंग मिसाळ, दशरथ कसबे, सुनिल पवार, सुनिल भापकर, सौ.उषा सूर्यवंशी, सौ.आशा वरखडे, प्रकाश सुरसे यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्याध्यापिका कांचन गावडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना वाव दिल्यास विद्यार्थी विविध क्षेत्रात यश संपादन करतात. यासाठी विविध स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थी सहभागी करुन त्यांना शिक्षकांच्या सहकार्याने योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी अशा स्पर्धांमध्ये यशस्वी होत आहे. एनएमएमएस परिक्षेतील विद्यार्थ्यांचे यश हे पालक, शिक्षक आणि संस्था चालकांच्या एकत्रित प्रयत्नाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी र.धों.कासवा, अ‍ॅड.विजयकुमार मुनोत यांनीही मनोगत व्यक्त करुन यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सेक्रेटरी र.धों.कासवा, सहसेक्रेटरी राजेश झालानी, खजिनदार विजय मुनोत, दिपक गांधी, राजेंद्र गुंदेचा, चंद्रकांत अनेचा, बन्सी नन्नवरे, रश्मी येवलेकर, संपतलाल मुथियान, अभय गांधी, संजय चोपडा, रमेश फिरोदिया, सुमन वारे, दिलीप गांधी, मनसुखलाल पिपाडा, कांचन भळगट, प्रमोदज गुगळे, मनसुखलाला गुंदेचा, एल.के.आव्हाड, सविता रमेश फिरोदियाच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी, विनोद कटारिया आदिंसह शिक्षक-शिक्षकतेर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post