राज्यात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू; 177 जणांना कोरोनाची लागण


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव सुरूच असून आज सकाळी मुंबईत पाच तर नागपुरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील रुग्णांचा आकडा शनिवार दुपरापर्यंतआता 177 वर पोहोचला आहे, तर मृतांचा आकडा 6 वर गेला आहे. मुंबईत काल मृत्यूमुखी पडलेल्या 85 वर्षीय डॉक्टरला कोरोना होता असे आज वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले आहे.

शुक्रवारी राज्यात एकाच दिवशी तब्बल 28 रुग्ण आढळले.यारुग्णांत इस्लामपूरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील 15 व्यक्तींचा, तर नागपूरमध्ये गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या चार सहवासितांचा समावेश आहे. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी 2 रुग्ण, तर पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. एक रुग्ण गुजरात राज्यातील आहे. आजवर राज्यात 24 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे हाेऊन घरी गेले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post