मोठी बातमी : कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुप 500 कोटी देणार


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. आतापर्यंत 933 प्रकरणे समोर आली आहेत तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक उद्योगपती पुढे सरसावत आहेत. अशातच टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला 500 कोटीची मदत करण्याचे जाहीर केले आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा म्हणाले की, कोरोनाशी लढण्यासाठी आपत्कालीन संसाधने लवकरात लवकर पुरवावीत. यापूर्वी वेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी 100 कोटी देण्याची घोषणा केली होती. तर महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनी एका महिन्याचा पगार देणार असल्याचे म्हटले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post