22 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचा 50 लाखांचा विमामाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - लाॅकडाऊनमध्ये गरिबांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी १.७० लाख कोटी रुपयांचे ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’ पॅकेज जारी केले. त्यानुसार, ८० कोटी गरिबांना ३ महिन्यांपर्यंत ५-५ किलाे जास्त मोफत धान्य दिले जाईल. स्वयंपाकाचा गॅसही मोफत मिळेल. सोबतच २०.५ कोटी महिलांना ३ महिन्यांपर्यंत ५०० रुपये व गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांना एकरकमी १ हजार रुपये मिळतील. काेरोनाविरुद्ध लढणाऱ्या सरकारी रुग्णालये व आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांच्या विम्याचीही घोषणा केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने सांगितले की १७ राज्यांत काेराेनाच्या रुग्णांवर उपचारांसाठी खास रुग्णालये सज्ज केली जात आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, आपण १००% साेशल डिस्टन्सिंग अवलंबले तर काेराेना संसर्गाची साखळी मोडीत निघेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post