....तर 30% मॉडर्न रिटेल स्टोअर्स बंद?


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे देशातील मॉडर्न रिटेल बाजारपेठही संकटात सापडली आहे. देशातील लॉकडाऊन जूनपर्यंत लांबल्यास सुमारे ३०% मॉडर्न स्टोअर्स बंद होऊ शकतात. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आरएआय) ही शंका व्यक्त केली आहे. त्यानुसार, असे घडल्यास ६० लाखांपैकी १८ लाख लोकांचा रोजगार हिरावला जाऊ शकतो.

आरएआयचे सीईओ कुमार राजागोपालन म्हणाले की, देशात सुमारे १५ लाख मॉडर्न रिटेल स्टोअर्स आहेत. ते ४.७३ लाख कोटींचा व्यवसाय करतात. कोरोना व्हायरसमुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत केवळ २० ते २५% व्यवसाय होत होता. फेब्रुवारीअखेरपर्यंत उत्पन्न घटून १५% वर आले होते. बंदमुळे खाद्यपदार्थ, किराण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंसह कपडे आणि इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या स्टोअर्सनाही प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. कपडे, दागिने, पादत्राणे, सीडीआयटी (कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ड्युरेबल, आयटी अँड टेलिफोन्स) स्टोअर्सची परिस्थिती सर्वात बिकट आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post