या मोठया पुरस्काराची आज होणार घोषणा
माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू मार्गदर्शक यांना दरवर्षी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात येते. 2018-19 च्या सत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आज आज मंगळवारी शिवछत्रपती पुरस्कार जाहीर होणार आहे. या पुरस्काराची घोषणा दुपारी चार वाजता राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार करणार आहेत. विजेते खेळाडूंचा 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया याठिकाणी पुरस्काराने गौरव करण्यात येईल.
असे आहे स्वरूप
महाराष्ट्रातील क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात येते. यासाठी एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, आणि मानचिन्ह देऊन खेळाडूंचा गौरव होतो.
खेलो इंडिया तील पदक विजेत्यांचा गौरव
ओडिसा येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या सत्राच्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्राचे खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी ठरली. सर्वाधिक 218 पथकासह महाराष्ट्र संघ सर्वसाधारण चॅम्पियनशिप चा मानकरी ठरला. या पदक विजेत्या खेळाडूंच्या गौरव सोहळ्याचे आयोजन 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील युवा खेळाडूंचा समावेश असणार आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूं सोबतच खेलो इंडिया तील पदक विजेते खेळाडू सन्मानित करण्यात येतील.
पदक विजेत्यांना मिळेल रोख बक्षीस
महाराष्ट्रातील खेळाडूंना बक्षिसाच्या स्वरूपात रोख रक्कम दिली जाणार आहे. यामध्ये सुवर्णपदक विजेत्या एक लाख, रौप्य पदकास 75 हजार आणि कांस्य पदकासाठी 50 हजार देणार आहे.
Post a Comment