भारतात औषधांच्या किमती वाढल्या




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाचा फटका आता भारतातील रुग्णांना बसला आहे. व्हायरसमुळे चीनच्या अनेक औषध कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे, चीनवरच अवलंबून असलेल्या भारतीय औषध कंपन्यांनी किमती वाढवल्या आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, चीनकडून होणारा पुरवठा थांबल्यामुळे भारतात पॅरासिटामॉलच्या किमतींमध्ये 40% वाढ झाली आहे. झाडुस कॅडिलाचे चेअरमन पंकज आर पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे, बॅक्टेरिया इंफेक्शनवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅण्टीबायोटिक अॅझिथ्रोमायसिनची किंमत तर 70% महागली आहे. हीच गत राहिल्यास येणाऱ्या काळात औषधींच्या किमती आणखी वाढण्याची भीती आहे.

अॅक्टिव फार्मासिटिकल्स इंग्रीडियंट्स (एपीआय) च्या आयतीसाठी भारत चीनवर खूप विसंबून आहे. कुठल्याही औषधी तयार करण्यासाठी एपीआय हा सर्वात महत्वाचा घटक असतो. डिरेटोरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलीजेंस अँड स्टॅटिस्टिक्सनुसार, 2016-17 मध्ये भारताने एपीआय घटक आयात करण्यासाठी 19 हजार 653.25 कोटी रुपये खर्च केली. यातील 66.69% माल चीनमधून आणला गेला. 2017-18 मध्ये भारताने 21 हजार 481 कोटी रुपयांची आयात केली. त्यामध्ये चिनी मालाचे प्रमाण वाढून 68.36% झाले. 2018-19 या काळात एपीआय आणि बल्क ड्रग्स आयात करण्यासाठी भारतीय औषध कंपन्या आणि कारखान्यांनी 25 हजार 552 कोटी रुपये खर्च केले.

चीनवर विसंबून राहण्याची नामुष्की का?

रसायन आणि खत मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ फार्मासिटिकल्सने दिलेल्या माहितीनुसार, भांडवल आणि आर्थिक कारणांमुळे भारत चीनकडून एपीआय आणि मोठ्या प्रमाणात बल्क औषधी आयात करत आहे. उत्पादनाला येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत चीनकडून एपीआय आणि बल्क औषधी मागवणे भारतीय औषध कंपन्यांसाठी फायद्याचे ठरते. औषध कंपन्यांशी संबंधित लोकांच्या माहितीप्रमाणे, चीनमध्ये एपीआय प्रॉडक्शनसाठी येणारा खर्च भारताच्या तुलनेत 30% कमी असतो. भारतात एपीआय प्रॉडक्शन युनिट असतानाही केवळ 30 टक्के उत्पादन घेतले जात आहे. तर उर्वरीत 70% पुरवठा चीनकडून केला जातो. भारतामध्ये एपीआय मॅन्युफॅक्चरिंगवर नफा खूप कमी असल्याने भारतीय औषध कंपन्या चीनकडूनच एपीआय आयात करत असतात आणि भारतात औषधी निर्माण करून दुसऱ्या देशांना पाठवतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post