गेट्सचा जावई / नेमका कोण आहे बिल गेट्स यांचा भावी जावई, येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती
माय अहमदनगर वेब टीम
न्यूयॉर्क - अब्जाधीश व्यक्ती बिल गेट्स यांची मुलगी जेनिफरने बुधवारी सोशल मीडियावर प्रियकर नाएल नासरसोबत एंगेजमेंट केल्याची घोषणा केली. 23 वर्षीय जेनिफर आणि 29 वर्षीय नाएल दोघांनीही आपल्या इन्स्टाग्रामवर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले. या दोघांवर मित्रपरिवार आणि कुटुंबियांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
बिल गेट्सचा भावी जावई नेमका आहे तरी कोण जाणून घ्या...
अमेरिकेतील शिकागो येथे जन्म, पालक कोट्यधीश, मूळचा इजिप्तचा
नाएलच्या ग्लोबल चॅम्पियन्स लीग बायोग्राफीनुसार, मुळचा इजिप्तचा असणाऱ्या नासरचा जन्म अमेरिकेतील शिकागो येथे झाला. अल अरेबिया इंग्लिश आणि अमीरात वुमननुसार, नाएलचे पालक कोट्यधीश असून ते अमेरिकेत एक आर्किटेक्चर आणि डिझाइन फर्म चालवतात. 2009 मध्ये ते अमेरिकेत स्थायिक झाले.
10 वर्षांचा असताना घोडेस्वारीचा छंद, नंतर जगभरातील विविध कॅम्पमध्ये ट्रेनिंग
नासरच्या बायोग्राफीनुसार त्याला वयाच्या 5 व्या वर्षापासून खेळाला तर 10 वर्षांपासून जम्पिंगला सुरूवात केली होती. त्याने जगभरातील विविध कॅम्पमध्ये घोडेस्वारीचे ट्रेनिंग घेतले आहे. नाएल2013, 2014 आणि 2017 मधील एफईआय विश्वचषक फायनल तसेच 2014 मधील एफआयआय विश्व अश्वारुढ गेम्ससाठी पात्र ठरला.
दोन-दोन डिग्री, हॉर्स रायडिंग आणि हॉर्स जम्पिंग चॅम्पियन
नासेरने जेनिफरप्रमाणेच उत्तर कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्याने 2013 मध्ये स्टॅनफोर्डमधून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे. नाएलला अरबी, फ्रेंज आणि इंग्लिश भाषा येत असल्याचे त्याच्या बायोग्राफीत सांगण्यात आले आहे.
नाएलने लॉन्गिनेस एफईआय जंपिंग वर्ल्ड कप लॉस व्हेगास, लॉस व्हेगास नॅशनल हॉर्स शो विनिंग राउंड सीएसआय 3, लॉन्गिनेस एफईआय जम्पिंग वर्ल्ड कप डेल मार, न्यूयॉर्क मास्टर्स सीएसआय 5, ग्रँड प्रिक्स आणि रॅबॅट सीएसआयओ 4, नियुक्त ऑलिम्पिंक पात्रता यांसह अनेक स्पर्धांमध्येही प्रथम क्रमांक मिळविला आहे.
एकाच हॉर्स रायडिंग क्लबमध्ये दोघांची भेट
जेनिफर सुद्धा एक घोडेस्वार आहे. दोघांची एकाच हॉर्स रायडिंग क्लबमध्ये भेट झाली होती. सीएनएनच्या एका शोमध्ये ती म्हणाली होती की, खेळाबद्दलच्या प्रेमानेच त्यांना एकत्र आणले. घोडे आमच्या आयुष्याचा फक्त एक भाग आहेत. परंतु आमचे खेळावर प्रेम आहे. नासर घोडेस्वारीबाबत व्यावसायिक आहे तर मला फक्त हौश आहे. म्हणून, घोड्यांविषयीचे आमचे प्रेम आणि छंद एकमेकांशी शेअर करणे केवळ अविश्वसनीय आहे.
नुकतेच कुटुंबियांची भेट करून दिली.
डिसेंबर 2017 मध्ये नासेर आणि जेनिफर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पश्चिम आशियात आले होते. यावेळी नासरने जेनिफरची आपल्या कुटुंबियांसोबत ओळख करून दिली होती. त्याने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट सुद्धा केली होती.
Post a Comment