'किसिंग सीन करतांना काही मजा नाही येत उलट
माय अहमदनगर वेब टीम
एंटरटेन्मेंट डेस्क - दिशा पाटनीचा आगामी चित्रपट ‘मलंग’ 7 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या दिशाने एका दैनिका सोबत केलेली बातचीत. तिने चित्रपटाशी निगडित अनेक सीन्स आणि आपल्या व्यस्त शेड्यूलबद्दल सांगितले. ‘मलंग’ चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूरदेखील मुख्य भूमिकेत आहेत.
तू चित्रपटात बरेच बोल्ड आणि किसिंग सीन देते, त्यामुळे खूप ट्रोलिंगदेखील होते, मीम्स बनवले जातात, याचा तू कसा विचार करतेस ?
आता तर या सर्वांची सवय झाली आहे. सोशल मीडियावर तर सर्वांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता मी याचा लोड घेत नाही, सवय झाली आहे. मीम्सबद्दल बोलायचे तर, तर असे नाहीये की, आम्ही मीम्स पाहात नाही, आम्ही मोबाइलवर ते पाहतो, जे हे मीम्स बनवतात ते कुणालातरी हसवत आहेत, मग यामध्ये वाईट काय आहे. चांगले आहे ना... आम्हालाही एन्जॉयकरू द्या आणि त्यांनाही.
किसिंग सीन करताना तू कोणत्या अभिनेत्यासोबत कंफर्टेबल राहिलीस ?
कुणासोबतचकंफर्टेबल नसते. लोकांना वाटते की, किसिंग करताना मजा येत असेल, पण असे नसते. जेव्हा तुम्ही असा सीन करत असता, तेव्हा तीन मोठे कॅमेरे तुमच्या आसपास लागलेले असतात. 50 लोक सेटवर असतात. जे तुम्हाला बारकाईने पाहत असतात. 10 लोक मॉनिटरमध्ये पाहात असतात. तर अशावेळी खूप प्रेशर असते. काही मजा नाहीये यामध्ये.
स्वतःबद्दल केलेल्या चांगल्या कमेंटतर वाचताच असशील ?
नाही, मी कमेंट वाचणे सोडले आहे.
तुमची फॅमिली तुमचे चित्रपट बघतात का आणि त्यांची याबद्दल काय प्रतिक्रिया असते ?
हो, सर्वच पाहतात. त्यांना आवडतातदेखील. पण ते यावर काहीही कमेंट करत नाहीत. निश्चितच त्यांची मुलगी आहे तर त्यांना माझे सर्वच चित्रपट आणि माझे काम आवडते. मी काही वाईट केले आहे का, याच्या डिटेलमध्ये ते जात नाहीत.
एका मुलाखतीदरम्यान टायगर श्रॉफ म्हणाला होता की, तू साधी वाटायचीस पण तू तर गुंडी आहेस,आम्ही जाणून घेऊ इच्छितो तू साधी आहेस की, गुंडी ?
हे तर तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्ही मला साधी म्हणून पाहता की, गुंडी म्हणून. जेव्हा मी लहान होते तेव्हा मी टॉमबॉय टाइप होते. माझे केस छोटे असायचे. दहाव्या वर्गापर्यंत लोक मला जादू म्हणायचे. शाळेत माझी खिल्ली उडवली जायची. पण मी खेळात चांगली होते. स्टेट लेव्हलवर बास्केटबॉल खेळायचे. बाइक चालवायचे. या सर्व माझ्या आवडी होत्या, पण तरीही थोडी लाजाळू होते. अशी नव्हते की, जाईनआणि कुणालाही मारून परत येईन. अशी माझी बहीण होती, जी पूर्ण गुंडहोती.
Post a Comment