बीजिंग - चीनच्या लष्कराने काेराेनाच्या संकटावर मात करण्यासाठी दहा दिवसांत रुग्णालय उभारण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. सुमारे १ हजार खाटांचे हे रुग्णालय असून त्याला ‘फायर गाॅड माउंटेन’ असे संबाेधले जात आहे. साेमवारी या रुग्णालयात पहिल्या रुग्णावर उपचार केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
काेराेना विषाणूचा संसर्गाचा केंद्रस्थानी असलेल्या वुहान येथील प्रसार राेखण्याच्या उद्देशाने चीन लष्कराने आराेग्य माेहिमेसाठी हातभार लावला. काेराेनाची बाधा झालेल्या लाेकांवर उपचाराची समस्या निर्माण झाल्यानंतर संवेदनशीलपणे ही समस्या हाताळण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यानुसार झटपट रुग्णालय उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. काही भागात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथेच साेमवारी उपचार सुरू हाेतील. रुग्णालय दाेन टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यास ‘थंडर गाॅड माउंटेन’ असे म्हटले जाते. या रुग्णालयात गुरुवारपासून रुग्णसेवा सुरू हाेणार आहे. येथे १६०० रुग्णांवर एकाच वेळी उपचार देण्याची सुविधा उपलब्ध हाेणार आहे. त्यावरून या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात येऊ शकते. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी नवीन रुग्णालयासाठी १४०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, वुहानमध्ये शिकत असलेल्या पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणले जाणार नाही, असे पाकिस्तानचे राजदूत नाघमना हाश्मी यांनी रविवारी स्पष्ट केले. काेराेना व्हायरसवर याेग्य दर्जाचा उपचार करणारी यंत्रणा पाकिस्तानात उपलब्ध नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे राजदूताने सांगितले.
काेराेनाचा मानवी संसर्ग झाल्यापासून सतर्क झालेल्या चीनच्या आराेग्य यंत्रणेने देशातील १.६३ जणांच्या तपासणीवर भर दिला. त्यापैकी सुमारे १.३७ लाख लाेकांवर वैद्यकीय निगराणी ठेवण्यात आली आहे. संसर्ग झालेल्यांवर तत्काळ वेनझाऊ शहरातील विशिष्ट ठिकाणी उपचार केले जात आहेत.
Post a Comment