विमान उतरताना अपघात; बर्फामुळे घसरलेले विमान घुसले थेट शेतात



माय अहमदनगर वेब टीम
केरमानशाह -इराणच्या केरमानशाहमध्ये उतरता उतरता एक प्रवासी विमान शेतातच उतरले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, धावपट्टीवर बर्फ जमला हाेता. त्यामुळे विमान घसरले आणि ३० फुटावरील शेतात जाऊन पाेहचले. या घटनेत काेणत्याही प्रकारे नुकसान झालेले नाही. विमानात १०२ प्रवाशांसह ११० जण हाेते. यात वैमानिक आणि क्रू हाेते. सर्व सुरक्षित आहेत. घटनास्थळी आपत्कालिन सेवा देण्यात आली आहे. इराणमध्ये एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

याच आठवड्यात १३५ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान रस्त्यावर उतरले हाेते
या आधी २७ जानेवारीला इराणच्या माहशहरमध्ये १३५ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान भर रस्त्यावर उतरले हाेते. या दुर्घटनेत सर्व यात्री बचावले हाेते. या अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post