भीषण अपघातातील मृतांचा आकडा 12 वर, मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील




माय अहमदनगर वेब टीम
जळगाव - यावल तालुक्यातील हिंगोणा गावानजीक क्रूझर व डंपर यांच्यात रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 12 प्रवासी ठार झाले असून 7 जण जखमी झाले आहेत. चोपडा येथे लग्नाचे रिसेप्शन आटोपल्यानंतर परतत असताना ही घटना घडली. मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. मृत्यू झालेले 7 प्रवासी चिंचोल ता. मुक्ताईनगर येथील तर 3 निबोल ता. रावेर येथील रहिवासी आहेत.

महाजन आणि चौधरी कुटुंबातील लोक रात्री बारा ते साडेबारा दरम्यान मुक्ताईनगर येथून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून निघाले होते. दरम्यान प्रवासातच क्रूझर आणि डंपरची भीषण धडक होऊन हा अपघात झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. जखमींना येवलामधून जळगावमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेआहे.

मृतांची नावे
मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 65), प्रभाकर नारायण चौधरी (वय 60), अश्लेषा उमेश चौधरी (वय 28), रिया जितेंद्र चौधरी (वय 14), प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय 40), सोनाली जितेंद्र चौधरी (वय 34), प्रियंका नितीन चौधरी (वय 28), सर्व रा. चिंचोल ता. मुक्ताईनगर तर सोनाली सचिन महाजन (वय 34 रा. चांगदेव ता. मुक्ताईनगर), सुमनबाई श्रीराम पाटील (वय 55 रा. निंबोल ता. रावेर), संगीता मुकेश पाटील (रा. निंबोल ता. रावेर)
जखमींची नावे

धनराज गंभीर कोळी (वाहन चालक), सर्वेश नितीन चौधरी (वय 9), शिवम प्रभाकर चौधरी (वय 13), सुनिता राजाराम पाटील (वय 45), मीना प्रफुल्ल चौधरी (वय 30) सर्व राहणार चिंचोल ता. मुक्ताईनगर आणि अदिती मुकेश पाटील (वय 14 रा निंबोल ता. रावेर).

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post