ईडीने शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सची कोट्यवधी रुपयांची संपत्ती केली जप्त,
माय अहमदनगर वेब टीम
बॉलिवूड डेस्क - ईडीने सोमवारी कोलकातातील सेंट जेव्हियर्स कॉलेज आणि शाहरुख खानची कंपनी कोलकाता नाइट रायडर्सशी संबंधित तीन संस्थांची 70.11 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या कंपन्यांवर अवैधरित्या व्यवहार केल्याचा आरोप आहे. या कंपन्या रोझ व्हॅली ग्रुप घोटाळा प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
ईडीने एका विधानात सांगितले की, "या संपत्तीमध्ये मल्टीपल रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंट जेव्हियर्स कॉलेज कोलकाता, नाइट रायडर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक खात्यातील 16.20 कोटी रुपयांचा समावेश आहे. याशिवाय रामनंगर आणि महिषदल, पुरबा मेदिनीपुर, पश्मिम बंगालमधील 24 एकर जमीन, मुंबईतील दिलकप चेंबर्समधील फ्लॅट आणि ज्योति बसु नगर, न्यू टाउनमधील एक एकर जमीन आणि कोलकात्यातील व्हीआयपी रोडवरील एक हॉटेल अशी संपत्ती जप्त केली आहे."
दरम्यान कोलकाता नाइट रायडर्सचा सर्वेसर्वा आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
Post a Comment