गरम भाजीच्या भांड्यात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू




माय अहमदनगर वेब टीम
मिर्झापूर(उत्तर प्रदेश)- जिल्ह्यात सोमवारी दुपारी शाळेतील मिड-डे-मीलसाठी बनवलेल्या गरम भाजीच्या भांड्यात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मुलीचे शाळेत नाव नव्हते, ती हट्ट करुन आपल्या भावांसोबत शाळेत गेली होती. ही घटना घडत होती, तेव्हा जेवण बनवणारी महिला कानात इअरफोन लावून गाणे ऐकत होती. इतकच नाही तर भांड्यात पडलेल्या चिमुकलीला बाहेर काढण्याऐवजी त्या महिलांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर डीएम सुशील कुमार पटेल यांनी शाळेच्या मुख्याध्यपकाला निलंबीत केले आहे. घटनेस कारणीभूत महिलांविरोधातही एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकरणत रामपूर अतरी गावातील प्राथमिक विद्यालयातील आहे. येथे सोमवारी दुपारी विद्यार्थांसाठी मिड-डे-मील बनवले जात होते. जेवण मुलांना वाढण्याची तयारी सुरू होती, यादरम्यान शाळेत शिकणारा 7 वर्षीय गणेश जोराने ओरडला की, त्याची बहिण आंचल भाजीच्या भांड्यात पडली आहे. यादरम्यान तिथे जेवण बनवणाऱ्या महिला, ज्या कानात इअरफोन लावून गाणे ऐकत होत्या, त्यांनी पळ काढला. मुलाचा आवाज ऐकून शिक्षक तिथे आले आणि मुलीला खासगी रुग्णालयात दाखल केले.


वडिलांनी शाळा प्रशासनाला मृत्यूस कारणीभूत धरले

80% टक्के भाजलेल्या मुलाला डॉक्टरांनी रीजनल हॉस्पिटलला रेफर केले, सोमवारी रात्री उपचारादरम्यान मुलीने जीव सोडला. मुलीचे वडील भागीरथ यांनी शाळेला मृत्यूस जबाबदार धरले आहे. खंड शिक्षण अधिकारी राममिलन यादव यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post