सार्सपेक्षाही कोरोना भयंकरच, एकाच दिवशी ८६ जणांचा मृत्यू



माय अहमदनगर वेब टीम 
बीजिंग - एक अमेरिकी महिला व जपानच्या व्यक्तीचा काेराेनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. काेराेनामुळे चीनमध्ये परदेशी नागरिकाचा मृत्यू हाेण्याची ही पहिलीच घटना आहे. आता चीनमधील मृतांची एकूण संख्या ७२२ वर पाेहाेचली आहे तर बाधितांची संख्या ३४ हजार ५९८ झाली आहे. शनिवारी एकाच दिवशी ८६ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळेच सार्सपेक्षाही कोरोना भयंकर असल्याचे सांगण्यात येते.

जिनयिनतांग रुग्णालयात अमेरिकी महिलेवर उपचार सुरू हाेता. त्यांचा ६ फेब्रुवारी राेजी मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेच्या राजदूत कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिली. चीनमध्ये १९ परदेशी नागरिकांना काेराेना विषाणूची बाधा झाल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तैवानमध्ये बाधितांची संख्या १६ वर गेली आहे. हाँगकाँगमध्ये २६ जणांना बाधा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मकाऊमध्ये १० बाधित आढळून आले. सुमारे १ हजार २८० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ५१० जण उपचारांती बरे हाेऊन घरी परतले आहेत.

दुसरीकडे ३ हजार डाॅक्टर व नर्सेस काेराेनाच्या समस्येवर मात करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत. वुहानमध्ये सध्या माेठ्या संख्येने आयसीयू व्यावसायिकांची गरज निर्माण झाली आहे. जागतिक आराेग्य संघटनेचे प्रमुख टेड्राेस अढानाॅम गेब्रेयसस म्हणाले, काेराेनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेलेे प्रतिबंधात्मक साधन असलेले मास्क व इतर साहित्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.

निर्यातीवर बंदी : आगामी काही दिवसांत कोरोनाच्या संशयितांना हाताळण्यासाठी वैयक्तिक प्रतिबंधात्मक साधनांची भारतात कमतरता आहे. सध्या ५० हजार साधनांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ २० हजार एवढे साहित्य आहे. त्यामुळे सरकारने अशा साहित्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

केरळ :३ हजार लाेक निगराणीखाली

केरळमध्ये काेराेना व्हायरसच्या संशयित ३ हजार १४ रुग्णांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.गेल्या चार दिवसांत राज्यात व्हायरसचा संसर्ग झाल्याचे नवे प्रकरण नाही.निगराणीखाली ठेवलेल्या ३ हजार १४ लाेकांपैकी ६१ लाेकांना विविध भागातील रुग्णालयांत ठेवले आहे.
चीनने कोरोनाचे तात्पुरतेनाव ठेवले ‘एनसीपी’
जागतिक आरोग्य संघटना कोरोना व्हायरसच्या नावासंबंधी विचार-विनिमय करत आहे. तथापि चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने या व्हायरसला आता नाॅव्हल काेराेनाव्हायरस न्यूमाेनिया (एनसीपी) हे नाव दिले आहे. शनिवारी यासंबंधी घोषणा करण्यात आली.
अमेरिका ७१५ कोटी रु. देणार, चीनची स्तुती
कोरोना व्हायरसच्या उच्चाटनासाठी चीन करत असलेल्या प्रयत्नाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले. त्याचबरोबरकोरोनाची बाधा झालेल्या देशांना मदत करण्यासाठी ट्रम्प यांनी ७१५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.
क्रुझवर ६४ जण बाधित, २०० भारतीय अडकले

सर्वच देश चीनमध्ये अडकलेल्या लोकांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान जपानच्या योकोहामा बंदरावर एका लक्झरी जहाजावर कोरोना व्हायरसच्या ६४ रुग्णांची पुष्टी करण्यात आली आहे. या जहाजात प्रवासी व कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ३७०० हून जास्त होती. त्यात २०० हून जास्त भारतीय होते, असे सांगण्यात आले. एका प्रवाशाच्या म्हणण्यानुसार या कर्मचाऱ्यांपैकी कोणीही कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह आढळून आल्याचे प्रकरण नाही. परंतु, या कर्मचाऱ्यांना पॉझिटिव्ह व्यक्तींपासून दूर ठेवण्याची गरज आहे. त्याच्या एक दिवस आधी जहाजावर ४१ नवीन प्रकरणांची नोंद जपानने घेतली होती. आपल्या एका आरामदायी जहाजाला माघारी बोलावले होते. ४१ प्रकरणांच्या पुष्टीसाठी २० बाधित प्रवाशांना टोकियोजवळ उतरवले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post