कमळ बघण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत; पवार यांचा भाजपला टोला



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अलीकडे पहिलीच्या मुलाला शिकवले जाते शरद कमळ बघ, छगन कमळ बघ, आणखीन काय काय कमळ बघ, असा चिमटा काढतानाच माझी आई स्कूल बोर्डात होती. सावित्रीबाई तिचा आदर्श. त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला.

शिक्षक भारतीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या शिक्षक भारती अधिवेशनाला शरद पवार यांच्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या वेळी बोलताना संजय राऊत यांनी ‘शरद पवार सिर्फ नाम ही काफी है,’ असे सांगत महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावे लागते आणि हे आपण दाखवून दिले आहे, या शब्दांत शरद पवार यांचा गौरव केला. ते पुढे म्हणाले, आधीच्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला. ‘आयचा घो’ हा शिवसेनेने संमत केलेला शब्द आहे. पाच वर्षांत भाजपने पाठ्यपुस्तकातले धडे आणि इतिहास बदलला त्यामुळे आपण सरकार बदलले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post