राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल; आझाद मैदानात होणार 'राजगर्जना'




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज ठाकरे यांनी सीएएला विरोध तर एनआरसीचे समर्थन केल्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा काढण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मोर्चाची जय्यत तयारी सुरु होती. या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले होते. या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेला संबोधित करतील. या मोर्चासाठी समविचारी संघटना येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मनसेने या मोर्चाला घुसखोरांविरुद्धच्या लढाईचे स्वरूप दिले आहे. या मोर्चासाठी जिमखाना आणि आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. पोलीस बांदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. या मोर्चासाठी मुंबईत मनसेचे पोस्टर्स आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरुन महामोर्चासाठी वातावरण निर्मिती करण्यात येत होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post