अर्थसंकल्प सहा मार्चला, महिला अत्याचारांवर एक पूर्ण दिवस चर्चा



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीला सुरू होत असून ते २० मार्चपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शाळांत दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक मांडले जाणार आहे. ६ मार्चला सकाळी ११ वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत. 

याशिवाय राज्यात महिलांवर वाढत असलेल्या अत्याचारांची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून ५ मार्चला एक संपूर्ण दिवस याच विषयावर सभागृहात चर्चा घडवून आणली जाणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक सोमवारी विधानभवन येथे पार पडली. यात विधानसभा आणि विधान परिषदेत अधिवेशन कालावधीत होणाऱ्या कामकाजाबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात व अन्य मंत्री बैठकीला उपस्थित होते.

सूत्रांनुसार, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचा विषय करण्याबाबतचे विधेयक मांडले जाणार आहे.

५ मार्चचा पूर्ण दिवस राखीव

महिलांवरील अत्याचाराची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. ते रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर मंथनासाठी ५ मार्चला दोन्ही सभागृहात चर्चा केली जाणार आहे. संध्याकाळी मंत्री उत्तरही देणार आहेत
.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post