अतिशय गरीब कुटुंबात जन्म घेणारे मायकल जॉर्डन आज सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक


माय अहमदनगर वेब टीम

बास्केटबॉलच्या गोष्टी निघतात तेव्हा मायकल जॉर्डन यांचे नाव सर्वात आधी येते. ते अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू आहेत. आता त्यांनी खेळणे बंद केले आहे. ते अतिशय गरीब कुटुंबात जन्मले. त्यांचे कुटुंब एका झोपडीत राहायचे. मात्र त्यांचा विचार नेहमीच काहीतरी मोठे करण्याचा होता. त्यामुळे गरिबी दूर होईल हा विचार. जॉर्डन १३ वर्षांचे असताना पित्याने त्यांना बोलावले. एक जुने वापरलेले कापड देऊन ते म्हणाले, ‘बेटा याची किंमत किती असेल मला सांग.’ मायकल थोडा विचार करून म्हणाले, एक डॉलर. तेव्हा वडील म्हणाले की बाजारात जाऊन हे दोन डॉलरला विकून ये. मायकलने ते कापड स्वच्छ धुतले. घरी इस्त्री नसल्याने कापडाच्या ढिगाऱ्याखाली ते ठेवले.

दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिले की ते कापड आता छान दिसत आहे. जवळच्याच रेल्वे स्थानकावर जाऊन पाच तासानंतर त्यांनी ते कापड विकले. आनंदी होऊन घरी आले अन् वडिलांना ते पैसे दिले. जवळपास १५ दिवसांनंतर पुन्हा वडिलांनी तसेच कापड दिले आणि ते २० डॉलरला विकण्यास सांगितले. मायकल हैराण झाले. या कपड्याला २० डॉलर कोण देईल, असा प्रश्न विचारला. वडील म्हणाले, एकदा प्रयत्न तर करून पाहा. मायकल यांनी पुन्हा एकदा डोके चालवले. आपल्या एका मित्राच्या मदतीने शहरात जाऊन कपड्यावर मिकी माऊसचे स्टिकर चिटकवले. हे कापड घेऊन ते श्रीमंत मुलांच्या शाळेसमोर उभे राहिले. एका छोट्या मुलाने त्यांना पाहिले आणि हट्ट करून वडिलांकडून ते कापड विकत घेतले. मुलाच्या वडिलांनी पाच डॉलर जास्त दिले. अशाप्रकारे जॉर्डन यांनी एका डॉलरचे कापड २५ डॉलरला विकून दाखवले. वडिलांना ते सांगितले. काही दिवसांनंतर वडिलांनी पुन्हा एक कापड दिले. म्हणाले, हे २०० डॉलरला विकून दाखव. हे खूप जास्त होते. मात्र मायकल काहीच म्हणाले नाहीत. कारण ते दरवेळी यशस्वी होत होते. यावेळी त्यांनी दोन-तीन दिवस वेळ घेतला. त्यांना कळत नव्हते की या कपड्याचे २०० डॉलर कसे येतील? अचानक त्यांना एक कल्पना सुचली. ते लगेच शहरात गेले. त्यादिवशी शहरात एक प्रसिद्ध अभिनेत्री आली होती. पोलिसांचे कडे तोडून ते त्या अभिनेत्रीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी पोहोचले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post