प्रेमाला नकार; महिलेच्या डाेक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयनमाय अहमदनगर वेब टीम
बीड - लग्नाची गळ घालत एकतर्फी प्रेमातून एका २५ वर्षीय घटस्फोटित महिलेवर हल्ला करून तिच्या डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात अाला. हा प्रकार बीड शहरात शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी आरोपीविरोधात पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली असून वरिष्ठ स्तरावरून याची दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी दुपारी अाराेपीस अटक करण्यात अाली अाहे.

बीड शहरातील पेठ बीड भागात २५ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. घटस्फोट झाल्याने ती सध्या आई वडिलांकडे राहते. तिला दोन मुलेही आहेत. दरम्यान, सुनील दत्तात्रय जाधव (रा. मोरगाव, ता. बीड., ह.मु. पेठ बीड) याची तिच्याशी लग्नापूर्वीची ओळख होती. या ओळखीतून मागील वर्षभरापासून तो त्या महिलेचा पाठलाग करून तिला माझ्याशी लग्न कर असे म्हणत त्रास देत छेड काढत होता. अनेकदा समज देऊनही त्याच्यात सुधारणा न झाल्याने मार्च २०१९ मध्ये महिलेने पोलिसांत धाव घेऊन सुनील विरोधात तक्रार दिली हाेती. यावरून अदखलपात्र गुन्हाही नोंद करण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळी महिला आपल्या घराकडे जात असताना सुनील जाधव याने ‘माझ्याशी लग्न कर’, असे म्हणत तिला अडवले. महिलेने लग्नाला नकार दिला. या वेळी दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा चिडलेल्या सुनील याने महिलेच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली अाहे. कुटुंबीयांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळ आणि रुग्णालयात भेट दिली. शनिवारी रात्रीच पीडितेचा जबाब घेऊन सुनील दत्तात्रय जाधव याच्या विरोधात विनयभंग, पाठलाग, छेडछाड, हल्ला आदी कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post