डी-मार्टच्या यशाचे रहस्य काय? मोठी सूट देऊनही नफ्यात


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अॅव्हेन्यू सुपर मार्केटचे मालक आणि संचालक राधाकृष्ण दमाणी नुकतेच देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. विशेष म्हणजे ६५ वर्षीय पहिले गुंतवणूकदार होते आणि ४७ वर्षांचे असताना २००२ मध्ये पहिले डी-मार्ट स्टोअर उघडले. त्यांनी १८ वर्षांतच दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल १.५ लाख कोटी रुपये आहे. कंपनीत ८० टक्के भागीदारी असणारे दमाणी १.२७ लाख कोटी रुपये संपत्तीचे मालक आहेत, तर ४.१३ लाख कोटी रुपये मालमत्ता असणारे मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत. डी-मार्टचे १९६ स्टोअर, ३६६ डिस्ट्रिब्युशन सेंटर आणि ७ पॅकिंग सेंटर आहेत. कंपनीचे देशभरात ९ हजार ७८० कर्मचारी आहेत.


  • डी-मार्टची सुरुवात करण्याआधी दमाणी अनेकदा अमेरिकेत गेले. त्यांना जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वाॅलमार्टचे संस्थापक सॅम वाॅल्टन यांची रिटेल थिअरी समजून घ्यायची होती. नंतर त्यांनी एव्हरी-डे लो प्राइस व एव्हरी-डे लो कॉस्टसारखी थिअरी कंपनीत लागूही केली. दमाणी बिकानेर, राजस्थानमधील निवासी. त्यांचे वडील शिवकिशन दमाणी स्टॉक ब्राेकर होते. वडिलांच्या मृत्यूनंतर स्टॉक मार्केट ब्रोकिंग उद्योगात आले. त्यांना तीन मुली. मोठी मुलगी मधू व दुसऱ्या क्रमांकाची मंजिरी यांचा विवाह मुंबईतील प्रख्यात चांडक डेव्हलपर कुटुंबात झाला आहे. मधू यांचा विवाह अभय चांडक व मंजिरी यांचा विवाह आदित्य चांडक यांच्याशी झालाय. डी-मार्ट स्टोअरच्या व्यवसायावर मोठी मधू व मंजिरी यांचे लक्ष असते. सिक्युरिटीज मार्केटमध्ये २५ वर्षांचा अनुभव असणारे दमाणी स्टॉक मार्केटवरील पुस्तके वाचतात.


1. दमाणी असे गर्भश्रीमंत, ज्यांचा आपल्या कंपनीत सर्वाधिक वाटा
नाव कंपनी (लिस्टेड) शेअर (%)

राधाकृष्ण दमाणी अॅव्हेन्यू सुपरमार्ट‌्स 79.8

गौतम अदानी अदानी एंटरप्रायजेस 74.9

एएम नायक एल अँड टी इन्फोटेक 74.8

टाटा सन्स टीसीएस 72

अतुल रुइया फीनिक्स मिल्स 62.7

शेखर बजाज बजाज इलेक्ट्रिकल्स 62.7

मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज 50
2. डी-मार्टचे रिलायन्सपेक्षा ५५ पट कमी स्टोअर, नफा मात्र ४ पट जास्त
कंपनी महसूल नफा स्टोअर

> डी-मार्ट 25844 965 196

> स्पेन्सर्स 18107 -- 120

> रिलायन्स रिटेल 13901 232 10901

> फ्यूचर रिटेल्स 12914 252 2000

> व्ही-मार्ट 9849 273 228
3. फ्लिपकार्ट, ओलासारख्या प्रसिद्ध कंपन्या तोट्यात, मात्र डी-मार्ट नफ्यात
> २००७ मध्ये सुरू झालेली देशातील सर्वात मोठी आॅनलाइन रिटेल कंपनी फ्लिपकार्ट तोट्यात आहे. २०१८-१९ मध्ये कंपनीला ५ हजार ४५९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर डी-मार्टने या काळात ९०२ कोटींचा फायदा मिळवला.
> याच प्रकारे देशातील सर्वात मोठी कॅब कंपनी ओलाला २०१७-१८ मध्ये २६७६ कोटी रु.चे नुकसान झाले, तर ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोलाही २०१८-१९ मध्ये ५७० कोटींचा तोटा झाला.
4. कमी ब्रँड ठेवतात, मध्यमवर्गीय निवासी भागात उघडतात स्टोअर
> स्वत:ची इमारत विकत घेतात. जर करारावर घेतली तर मुदतही ३० वर्षांपेक्षा जास्त असते.
{देशातील एफएमसीजी इंडस्ट्रीत विक्रेत्यांना १२ ते २१ दिवसांत पैसे मिळतात. तर डी-मार्ट आपल्या विक्रेत्यांना अकराव्या दिवशीचे पैसे अदा करते.

> वस्तूंचे काही प्रमुख ब्रँड अाणि आपल्या ब्रँडचेच साहित्य ठेवतात. म्हणजे ग्राहक गोंधळत नाही.

> डी-मार्टमध्ये साठा संपण्याचा सरासरी कालावधी ३० दिवस. तर बहुतांश कंपन्यांमध्ये ७० दिवस.

> नवीने स्टोअर उघडण्याची गती कमी आहे. रिलायन्स रिटेल २००६ मध्ये सुरू झाले आणि त्यांचे दहा हजारापेक्षा जास्त स्टोअर आहेत. तर डी-मार्ट २००२ मध्ये सुरू झाले आणि त्यांचे सध्या २०० पेक्षा कमी स्टोअर आहेत.

> बहुतांश रिटेल स्टोअर मध्यमवर्गीय निवासी भागात उघडतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post