...म्हणून जेवणामध्ये काकडी खातात!


माय अहमदनगर वेब टीम
काकडी सालीसकट खावी. कारण सालीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. काकडीच्या सालीचा दुसरा उपयोग म्हणजे काकडीची साल जळजळ होत असलेल्या भागावर किंवा उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवर लावल्यास खूप आराम मिळतो.

लो कॅलरीज आणि पाण्याचा साठा यामुळे डाएट करणार्‍या लोकांसाठी काकडी उत्तम आहे. शरीराला नको असलेले द्रव्यपदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं काम काकडी करते. तोंडाला दुर्गंधी येत असेल तर काकडीची चकती तोंडात वरच्या भागात जिभेच्या साहाय्यने धरून ठेवावी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post