‘युनाईटेड सिटी प्रिमिअर’ क्रिकेट चषक संजय नाईट रायडरने पटकाविला


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - आज मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक शारीरिक समस्यांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहेत. मैदानी खेळाची चर्चा होते; परंतु प्रत्यक्षात कितीजण मैदानी खेळ खेळतात ही शंका आहे. युनाईटेड सिटी हॉस्पिटलच्यावतीने आयोजित या क्रिकेट स्पर्धेत सर्वच क्षेत्रातील लोकांना मैदानी खेळाकडे वळविले आहे. या स्पर्धेमुळे अनेकजण बर्‍याच वर्षांनी मैदानावर आले आहे, याचा त्यांनाही आनंद झाला आहे. या चांगल्या उपक्रमांचे नियमित आयोजन होणे गरजेचे आहे. या स्पर्धेमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र आल्याने एक चांगले टिमवर्क यापुढे शहरात निर्माण होऊन शहराच्या विकासास चालना मिळेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

युनायटेड सिटी हॉस्पिटल आयोजित ‘सिटी प्रिमिअर 2020’ क्रिकेट स्पर्धेतील विजेते संजय नाईट रायडर या संघास 41 हजार रुपये, चषक प्रदान करतांना आ.संग्राम जगताप. याप्रसंगी डॉ.इम्रान शेख, डॉ.शबनम शेख, डॉ. चंद्रकांत केवळ, रफिक मुन्शी, डॉ.रविंद्र मिरगणे, उबेद शेख, प्रा.माणिक विधाते, डॉ.अजय साबळे, हरिभाऊ डोळसे, सुहास मुळे, डॉ.संतोष गांगर्डे, डॉ.जयदीप हरदास डॉ.एम.के.शाह, डॉ.रिजवान शेख, डॉ.पोपट कर्डिले, डॉ.सुवर्णा होशिंग, डॉ.सोनल भालसिंग, फैय्याज केबलवाला, डॉ.एम.के.शेख, राजेंद्र पडोळे, अ‍ॅड.गोरक्षनाथ ढेरे आदि मान्यवर उपस्थित होते.

अंतिम सामना संजय नाईट रायडर विरुद्ध आयकॉन इन्फ्रा यांच्यात झाला. यामध्ये संजय नाईट रायडर विजेता तर आयकॉन इन्फ्रा उपविजेता ठरला. तृतीय युनायटेड सिटी हॉस्पिटल संघ, चतुर्थ शाओमी मंगलदीप संघ ठरला. या बेस्ट बॅटस्मन श्रेयाल शिंदे, बेस्ट बॉलर शाहरुख सय्यद, बेस्ट फिल्डर विशाल सिंग, मॅन ऑफ दी सिरिज मुदस्सर तांबटकर आदिंना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच या संपूर्ण सामन्यांमध्ये पंच म्हणून चैतन्य कोलगडे, नितीन कचकल, सिराज काझी, भैय्या पवार, हरिथ सिद्धीकी, अफताब शेख, वाजीद शेख आदिंनी काम पाहिले. तर समालोचन डॉ.इम्रान शेख, शुभम दळवी, रामभाऊ, मुदस्सर शेख, संदेश आदिंनी काम पाहिले.

याप्रसंगी इम्रान शेख म्हणाले, आज प्रत्येकाच्या मागे धावपळ आहे, स्वत:बरोबरच इतरांकडेही लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे मनुष्य अनेक आजारांची शिकार होत आहे. यासाठी हे टेन्शन कमी करण्यासाठीच या मैदानी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पत्रकार, डॉक्टर्स, पोलिस, वकिल, इंजिनिअर, सरपंच, नगरसेवक, उद्योजक, ज्येष्ठ नागरिकांनाही या स्पर्धेत सहभागी करुन सर्वांना खेळाचा आनंद व महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांचा मिळालेला प्रतिसाद पाहता दरवर्षी अशा स्पर्धा आयोजित करण्याची सूचना अनेकांनी केली. त्या दृष्टीने संयोजन समिती नियोजन करेल. स्पर्धा यशस्वीतेसाठी अनेकांनी केलेले सहकार्य मोलाचे ठरल्याने चांगल्या पद्धतीने संपन्न झाल्या, याचा आनंद असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघ मालक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्पर्धेसाठी सहकार्य करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post