सरपंच पदाचा सन्मान देशपातळीवर वाढविण्याचे काम पोपटराव पवारांनी केले :शिवाजी कर्डिले
पद्मश्री मिळाल्याबद्दल पवार यांचा डोके परिवारातर्फे सत्कार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- सरपंच पदाच्या माध्यमातून हिवरे बाजार गावचा कायापालट करण्याबरोबरच अनेक गावेही समृद्ध केली. तसेच सरपंच पदाचा सन्मान देशपातळीवर वाढविण्याचे काम पोपटराव पवार यांनी कले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
वृक्ष मित्र बलभीम डोके यांच्यावतीने पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वृक्षमित्र बलभीम डोके, उद्योजक चंद्रकांत गाडे, बापूसाहेब डोके, सूर्यकांत डोके, शिवजीत डोके, प्रसाद डोके, किशोर मरकड, बाळासाहेब पवार, दिलीप मिस्कीन, डॉ. अविनाश मोरे, प्रा. सीताराम काकडे, संजय गाडे, धनंजय गाडे, शिवाजी साबळे, नितेश शेळके, संजय डोंगरे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बलभीम डोके म्हणाले, पोपटराव पवार यांच्या कामाचा आदर्श आपण या वयातही घेतला आहे. त्यांच्या प्रमाणेच वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करण्याचे काम वृद्धापकाळातही आपण करत आहोत. आजच्या युवा पिढीने पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास अनेक गावे समृद्ध होतील.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, हा पुरस्कार केवळ ग‘ामस्थांमुळे मिळाला आहे. ग्रामस्थांच्या एकीमुळे गावचा विकास करणे शक्य झाले. याच ऊर्जेमुळे देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली. यापुढील काळात पाण्यासाठी आणि पर्यावरणासाठी काम करण्याची खरी गरज आहे. या कामासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
Post a Comment