धक्कादायक ! शिक्षक शाळेत विद्यार्थिनींना दाखवायचा अश्लील क्लिप


माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - शहरातील एका शाळेतीलशिक्षकाने विद्यार्थिनींनामोबाइलवर अश्लील क्लिप दाखवत असल्याचा धक्कादायकप्रकारउघडकीस आला. संबंधिक प्रकार समजताचसंतप्त पालकांनी शाळेत गोंधळ घातला असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संस्था आणि मुख्याध्यापक शिक्षकास पाठीशी घालत असल्याचा पालकांनी आरोप केला आहे.

सिडको शहरातील एका शिक्षण संस्थेतील शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींना मागील तीन दिवसांपासून विद्यालयाच्या वरच्या रूममध्ये बोलावून त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवत होता. एका विद्यार्थिनीनेपोलिसांनानिनावी पत्र लिहून शाळेत घडत असलेला प्रकार सांगितलाहोता.दरम्यानएकासातवीतीलविद्यार्थिनीनेघरच्यांनाघडलेलासर्वप्रकारसांगितला. यानंतर पालकांनी मुख्याध्यापकास घेराव घालून संबंधिक प्रकाराचा जाब विचारला. संबंधिक शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी सिडको पोलिसांत गर्दी केली होती. दोषी शिक्षकाला पकडण्याची मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान संस्था आणि मुख्याध्यापक शिक्षकास पाठीशी घालत आहेत, मुलींनी घरी काही सांगू नये म्हणून दबाव आणल्याचा पालकांनी आरोप केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post