भाजपा नगर तालुकाध्यक्षपदी मनोज कोकाटे यांची वर्णी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : भारतीय जनता पार्टीच्या नगर तालुकाध्यक्षपदी चिचोंडी पाटीलचे सुपुत्र मनोज कोकाटे यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी कोकाटे यांना तसे नियुक्ती पत्र दिले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातून सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे. यापूर्वी तालुकाध्यक्ष या पदावर दिलीप भालसिंग हे सुमारे सहा वर्षांपासून काम पाहत होते, परंतु आता कोकाटे यांना पदाचा मान दिला गेला आहे. यापूर्वी त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी काम केले आहे, कोकाटे हे माजी पालकमंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे व आमदार बबनराव पाचपुते यांचे कट्टर समर्थक मानले जातात.जिल्हा अध्यक्ष मुंडे यांनी तीन तालुक्यातील निवडी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये जामखेड, पारनेर च्याही निवडी जाहीर झाल्या आहेत.नगर तालुका अध्यक्ष पदावर शाम पिंपळे यांनी 2008-2011, शरद दळवी यांनी 2011-2014 व दिलीप भालसिंग यांनी 2014 -2020 पर्येत काम पाहिले. भालसिंग यांनाजवळपास सहा वर्षांचा कालावधी मिळाला आहे.
Post a Comment