'नातं रक्ताचं' उपक्रमात २०० महाविद्यालयीन युवक, युवतींनी केले रक्तदान
स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे जिल्हा रुग्णालयात सलग सातवे रक्तदान शिबीर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - स्वयंभू युवा प्रतिष्ठान संचलित नातं रक्ताचं उपक्रमाचे सातवे महापर्व मंगळवारी (दि.४) जिल्हा शासकीय रुग्णालयात पार पडले. या निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे १५० ते २०० महाविद्यालयीन युवक, युवतींनी एकत्र येत रक्तदान केले.
या महारक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. श्रीमती भारती दानवे समवेत प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष अजित धस, माधव राऊत, रक्तविर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष किशोर डमाळे तसेच सचिव किशोर काळे हे उपस्थित होते.
या वेळी बोलताना अजित धस म्हणाले की, रक्त कुठल्या कारखान्यात निर्माण करता येत नाही. त्यामुळे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदानाशिवाय दुसरा पर्याय नाही. रक्तदान केल्यामुळे रक्ताचे नसणारे नाते जपणेही शक्य आहे. रक्तदान हे महादान आहे. आजच्या तरूण पिढीने रक्तदान शिबीरात सहभागी होऊन चांगले काम करत रहावे. रक्तदानामुळे रक्ताचे नाते निर्माण होते. युवा पिढीने समाजात मोठ्या प्रमाणात चांगले काम करत रहावे, असे आवाहन करतानाच स्वयंभू व चैतन्य युवा प्रतिष्ठानचा रक्तदान शिबीराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
प्रा.भारती दानवे म्हणाल्या की, रक्तदानातून निर्माण होणारे गुंज प्रत्येकाच्या मनात वाजली पाहिजे. त्यातून स्वयंभु युवा प्रतिष्ठान सारखे काम देशभर उभे राहिले पाहिजे. नवनिर्मितीचा ध्यास युवकांनी घ्यायला हवा. असे विविध उपक्रम युवकांनी हाती घेऊन गोरगरिबांना मदत केली पाहिजे. आज खरच या युवकांनी एक आदर्श घडवणारे काम केले आहे. असे प्रतिपादन दानवे यांनी केले. यावेळी यावेळी स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment