त्वचेसाठी मुलतानी माती का आहे फायदेशीर


माय अहमदनगर वेब टीम-
वास्तविक मुलतानी माती ही जगभरात बऱ्याच ठिकाणी मिळते आणि याचा उपयोग जगभरात सगळीकडे करण्यात येतो. पण याव्यतिरिक्त जगभरात सौंदर्यप्रसाधन आणि वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी कुठे जास्त प्रमाणात तर कुठे कमी प्रमाणात याचा उपयोग केला जातो. वर्ष 2005 मध्ये अमेरिका या मातीचा सर्वात मोठा उत्पादक होता जो साधारणम 70 टक्के मुलतानी मातीचं उत्पादन करत होता.
त्यानंतर जपान आणि मेक्‍सिको यांनी उत्पादनात बाजी मारली. पण मुळात याचा उगम हा पाकिस्तानमधील मुलतानमध्ये झाल्यामुळेच याचं नाव मुलतानी असं ठेवण्यात आलं आहे. मुलतानी मातीचा सर्वात मोठा गुण म्हणजे यामध्ये तेल, पाणी आणि रंग शोषून घेण्याची क्षमता असते सौंदर्याच्या बाबत जर मुलतानी मातीच्या फायद्याबाबत सांगायचं झालं तर ही माती त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.
जाणून घेऊया फायदे
- मुलतानी मातीचा उपयोग हा नैसर्गिक स्क्रब म्हणून करण्यात येऊ शकतो
- मुलतानी माती त्वचेवरील व्हाईट आणि ब्लॅक हेड्‌स काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे
- मुलतानी माती डेड सेल्स काढून टाकून त्वचा क्‍लिन करते आणि त्वचेवरील घाण साफ करून उत्कृष्ट क्‍लिन्झर म्हणून काम करते
- मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम असतं जे चेहऱ्यावरील पिंपल्स काढून टाकण्यासाठी मदत करतं. तसंच चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यासाठीही याची मदत होते
- मुलतानी माती केसांना कंडिशन करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे
तुम्हाला जर केसगळतीची समस्या असेल तर त्यासाठीदेखील तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता
- तुम्हाला तुमचे केस मजबूत, काळे आणि मऊ हवे असतील तर नियमित स्वरूपात मुलतानी मातीचा हेअर मास्क लावायला हवा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post