जिल्हा व तालुकास्तरीय शासकीय समित्यांच्या निवडी पंधरा दिवसांत


मुश्रीफ यांची महाविकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : जिल्हा व तालुकास्तरीय शासकीय समित्यांची निवडी पंधरा दिवसांत करण्यात येतील, त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी तातडीने कार्यकर्त्याच्या नावांची यादी द्यावी, अशी सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. यामधुन आता तिनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विविध समित्यावर संधी मिळणार आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज नगरच्या दौर्‍यावर आहेत. आज सकाळी त्यांनी विश्रामगृहावर शासकीय समिती वाटपासंदर्भात चर्चा केली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.संग्राम जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आदी उपस्थित होते.

राज्याच्या महाविकास आघाडी सत्तेतील घटक पक्ष राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची पालकमंत्री मुश्रीफ यांनी विश्रामगृहावर दुपारी बैठक घेतली. नगर जिल्ह्यात काम करणार्‍या तीनशेवर शासकीय समित्यांतून 3 ते 4 हजार अशासकीय सदस्य नियुक्तीचा विषय प्रामुख्याने या बैठकीत होता. शासकीय समित्यांसाठी राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची यादी तातडीने आपल्याकडे सूपूर्द करावी. पंधरा दिवसानंतर शासकीय समितींची निवड केली जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

शासकीय समित्यांअभावी कामांना गती येत नसल्याने या समित्या तातडीने जाहीर करण्यात येतील, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार आहेत. त्या जिल्ह्यात त्या पक्षाला समिती वाटपात 60 टक्के व अन्य दोन पक्षांना प्रत्येकी 20-20 टक्के सूत्र असल्याचे सांगण्यात येत आहे. या सुत्रांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक समित्या मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यावेळी काँग्रेसच्या वतीने विनायक देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी आज शासकीय विश्रामगृहात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय समित्या गठीत करण्याच्या धोरणाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी ना.प्राजक्त तनपुरे, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.संग्राम जगताप, आ.लहु कानडे, आ.आशुतोष काळे, आ.निलेश लंके, जेष्ठ नेते तथा माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जि.प.अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले , काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, मा.आ.चंद्रशेखर घुले पा., सर्वश्री सोमनाथ धूत, बाळासाहेब जगताप, ज्ञानदेव वाफारे,अशोकराव गायकवाड, अशोकराव सावंत आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post