शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी आला नवा पाहुणा


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. दोघांनी सरोगसीच्या मदतीने मुलगी जन्माला आल्याची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर शिल्पाने इन्स्टाग्रामवर मुलीचा पहिला फोटोही शेअर केला आहे. शिल्पा आणि राज यांनी मुलीचं समीशा असं नाव ठेवलं आहे. १५ फेब्रुवारी २०२० ला समीशाचा जन्म झाला. हे शिल्पा आणि राजचं दुसरं मुल आहे.


शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी २२ नोव्हेंबर २००९ मध्ये लग्न केलं होतं. २१ मे २०१२ मध्ये शिल्पाने विहानला जन्म दिला होता. आठ वर्षांनी दोघांनी सरोगसीद्वारे पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला. समीशाचा फोटो शेअर करताना शिल्पाने लिहिले की, 'ओम गणेशाय नमः आमच्या प्रार्थनांना उत्तर मिळालं. आम्हाला हे सांगायला आनंद होतो की आमच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे. समीशा शेट्टी कुंद्रा. समीषाचा १५ फेब्रुवारी २०२० ला जन्म झाला. घरात ज्यूनिअर एसएसके आली आहे.'
सध्या राज आणि शिल्पा विहानसोबतचं त्यांचं आयुष्य पूर्ण एन्जॉय करत आहेत. आता त्यांच्या आयुष्यात समीशा आल्याने त्यांचं कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालं असंच म्हणावं लागेल. शिल्पा शेट्टीच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे, सब्बीर खान दिग्दर्शित एका सिनेमात ती दिसणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post