वादग्रस्त वक्तव्य भोवल : वारिस पठाणांवर माध्यम बंदी!


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी माजी आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध केला. सोबतच, पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर आता त्यांना मीडियाशी बोलता येणार नाही. पक्ष पुढील आदेश देत नाही तोपर्यंत वारिस पठाण कुठल्याही माध्यमाला निवेदन किंवा प्रतिक्रिया देऊ शकणार नाहीत. "100 कोटी लोकांवर आम्ही 15 कोटी भारी आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा." असे विधान वारिस यांनी केले होते. तेव्हापासूनच त्यांच्या या विधानाचा सर्वत्र निषेध केला जात आहे.

गुलबर्गा येथे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनीही उपस्थिती लावली होती. सभेला संबोधित करताना ते म्हणाले होते, "आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे आहे. पण ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यावे लागते. सध्या केवळ वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला आहे. जर आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण 15 कोटी आहोत. पण या 100 कोटींना भारी पडू." सीएए आणि एनआरसीचा विरोध करताना त्यांनी आपल्या भाषणात हिंदू-मुस्लिम असा रंग दिला अशीही टीका पठाण यांच्यावर करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post